माझे हे पुस्तक म्हणजे राजकीय अर्थव्यवस्थेच्या चष्म्यातून केलेले जातीच्या मुख्य प्रवाहातील समाजशास्त्राचे तटस्थ विश्लेषण आहे
जातीच्या जुन्या-नव्या अभ्यासांचे जेव्हा मी वाचन केले, तेव्हा त्यांच्यात मला गंभीर स्वरूपाच्या काही उणिवा प्रकर्षाने दिसून आल्या. एक बाबीवरून दुसऱ्या बाबीकडे माझे विचारचक्र फिरू लागताच इतर अभाव आढळले. लवकरच माझ्या लक्षात आले की, जातीच्या मुख्य प्रवाहातील समाजशास्त्राच्या अभ्यासातील उणिवा एका लेखात सामावणे अशक्य आहे.......